स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मौजे लिंगदरी येथे "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष शिबीर" आयोजित करण्यात येत आहे.
दि.२४ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या मार्फत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व लिंगदरी ग्रामस्थ यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी मुख्य उपस्थिती श्री. गंगाधर सरकटे (नेत्र सहायक),श्री. नवनाथ कोल्हाळ (नेत्र सहायक) यांची होती. कार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही.बी. कल्याणकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत सदर नेत्र तपासणी शिबिर आयोजनामागील भूमिका विशद केली.
कार्यक्रम अधिकारी प्रा. टी.यू.केंद्रे यांनी डोळ्यांचे आरोग्य कसे सांभाळावे?, यासाठी कोणता आहार घ्यावा? तसेच डिजिटल उपकरणाच्या वापराबाबत देखील विशेष सूचना दिल्या.
याप्रसंगी ५७ ग्रामस्थांची नेत्रतपासणी करण्यात आली. कार्यक्रमाधिकारी डॉ.आर. व्ही. नवगणकर यांनी सदर शिबिराचे संचलन करत ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.पी.बी. कऱ्हाळे, श्री. डी.एन. भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.
|
|