Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

NSS

लिंगदरी येथे रासेयो शिबिरामध्ये पशु आरोग्य तपासणी संपन्न

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मौजे लिंगदरी येथे "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष शिबीर" आयोजित करण्यात येत आहे.
दि.२४ जानेवारी रोजी पशुसंवर्धन विभाग,सेनगाव, दुग्धशास्त्र विभाग तोष्णीवाल महाविद्यालय,सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे लिंगदरी येथील दुग्धजन्य जनावरे, गाय, बैल,शेळी व पाळीव प्राणी इत्यादी जनावरांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. प्रफुल्ल निचळ (सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग,सेनगाव), डॉ. स्वरूप लिंगायत (पशुधन विकास अधिकारी,सेनगाव), श्री. सचिन लिंबेकर (परिचर), श्री.बालाजी शिंदे (ड्रेसर),श्री विलास राठोड (सरपंच लिंगदरी) हे उपस्थित होते.
यानंतर बौद्धिक वर्गात प्रा. ए.पी. नाईक यांनी "कडधान्य यांचे आहारातील महत्त्व" या विषयावर स्वयंसेवक व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रा.डी.डी.थोरात,डॉ.पी.एन. तोतला,डॉ.एन.एस.बजाज, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी डॉ. व्ही.बी.कल्याणकर,प्रा. टी.यू.केंद्रे,डॉ.आर. व्ही.नवगणकर,श्री.पी.बी. कऱ्हाळे, श्री. डी.एन. भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.