Announcements CMS College Mobile app

NSS

लिंगदरी येथे आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिक सादर

 

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मौजे लिंगदरी येथे "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष शिबीर" आयोजित करण्यात येत आहे.
सदर शिबिरामध्ये दि.२१ जानेवारी रोजी "आपत्ती व्यवस्थापन" या विषयावर विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्रस्ताविकात कार्यक्रमाधिकारी प्रा. टी. यू.केंद्रे यांनी आपत्ती व्यवस्थापन याचे दैनंदिन जीवनातील गरज व महत्त्व उदाहरणासह समजावून सांगितले.
सदर आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकासाठी पवन राठोड, कृष्णा राठोड, राजेश राठोड, गोकुळ आडे यांनी मार्गदर्शन व उपायोजना करून दाखविल्या.
कार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही. बी. कल्याणकर व डॉ. आर. व्ही. नवगणकर यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने परिसरातील लिंगेश्वर, गोरक्षनाथ,महाकाली देवी, शनिदेव आदी मंदिराची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती संकलित करून सदर मंदिर परिसराची स्वच्छता केली.
सदर कार्यक्रमासाठी श्री.पी.बी. कऱ्हाळे, श्री. डी.एन. भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.सदर कार्यक्रमासाठी ग्रामस्थ उपस्थित होते