Announcements CMS College Mobile app

NSS

लिंगदरी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मौजे लिंगदरी येथे "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष शिबीर" आयोजित करण्यात येत आहे.

सदर शिबिराचे उद्घाटन दि.२० जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी.तळणीकर तर उद्घाटक म्हणून सौ. सुनीता विलास राठोड (सरपंच,लिंगदरी) या तर प्रमुख उपस्थिती श्री. गजानन मुळे (मुख्याध्यापक,जिल्हा परिषद, लिंगदरी),श्री.समाधान वाघमारे (ग्रामसेवक,लिंगदरी), प्रा. डॉ. पी. बी. पाटील, प्रा.डॉ. एस. आर.पजई हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. व्ही.बी. कल्याणकर यांनी जीवसृष्टी व ग्रामीण विकास यांच्याशी समरूप होऊन विद्यार्थ्याला ग्रामीण विकासाचा एक हिस्सा बनवून देशाचा विकास करणे हा उद्देश घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी भूमिका व्यक्त केली.
श्री मुळे सर यांनी मागील वर्षी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविला गेलेल्या विविध कार्यक्रमांची उजळणी करत, गावाच्या विकासासाठी सदर शिबिर हे एक संजीवनी ठरणार आहे.अशी अशा व्यक्त करत गावच्या सरपंच सौ. सुनीता राठोड व ग्रामस्थ यांच्या वतीने संपूर्ण सहकार्याची हमी देखील दिली.
प्राचार्य डॉ. एस.जी. तळणीकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेच्या इतिहास व वाटचाल याबद्दलचा मागवा घेत,सदर राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन व अध्यापन या चौकटीच्या बाहेर येऊन सामाजिक भान व जाणिवेचे धडे देखील गिरवले जातील अशी आशा व्यक्त करत, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचे व स्वयंसेवकांचे कौतुक देखील केली केले.

सदर शिबिराच्या उद्घाटनानंतर कार्यक्रमाधिकारी प्रा. टी.यू.केंद्रे यांनी सदर शिबिरामध्ये राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण शिक्षण, मतदार जनजागृती, योगाभ्यास, नैसर्गिक संसाधन व संवर्धन,ग्राम स्वच्छता, सर्वांगीण ग्रामीण विकास, आपत्ती व्यवस्थापन, पशुरोग निदान, बालविवाह, रस्ता सुरक्षा, तृणधान्य आहार महत्त्व, निरनिराळे सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रम याविषयी विस्तृत अशी माहिती देत त्याची उपयोगिता व महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाधिकारी डॉ.आर. व्ही.नवगणकर यांनी मापारी गजानन, गौरव कांबळे, अभिषेक नागरे,शोएब पठाण, साहिल शहा, कु. अंकिता खंदारे, कु.स्नेहल खंदारे यांची गटप्रमुख पदी नेमणूक केली.
कार्यक्रमाचे संचलन कु. अंकिता हलगे यांनी तर आभार कु. स्नेहल खंदारे यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमासाठी प्रा. कठाळे आर. एस.,प्रा. एस. बी. फड, डॉ.पाटील डी.डब्लू, प्रा. शिंदे एच.टी., प्रा. थोरात डी.डी., प्रा. नाईक ए.पी., प्रा. गायकवाड एन. एस., डॉ. मरकड एस. एस., डॉ. गोरे आर.एस., डॉ. घुटे बी.बी., प्रा. तडस डी.पी., डॉ. तोतला पी. एन., डॉ. धारवाडकर डी.एस., प्रा. इंगोले बी.डी., श्री.पी.बी. कऱ्हाळे, श्री. डी.एन. भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.सदर कार्यक्रमासाठी लिंगदरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते