*Reaccreditated by NAAC with 'B++' Grade(CGPA: 2.98)*, *ISO 9001: 2015 certified*
Announcements कै. अयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धा (सन २०२४-२५) ; National Conference on "Recent Advances in Mathematical Sciences (RAMS-2025)" National Conference on "Navigating the future: Innovations in library science(NFILS-2025)"
तोष्णीवाल, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथील करिअर मार्गदर्शन (करियर कट्टा) कक्षाच्या साह्याने “बँकिंग क्षेत्रातील करियर आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. |
दिनांक: २१ जानेवारी २०२५ |
श्री. गणेश दहातोंडे सरांनी आपल्या मार्गदर्शनात प्रथमतः यूपीएससी, एमपीएससी व आयबीपीएस परीक्षेची ओळख करून दिली. आपल्या अनुभवातून त्यांनी ग्रामीण भागातून असलेला एखाद्या विद्यार्थी शहरी भागात गेल्यानंतर आर्थिक कारणामुळे न्यूनगंडासमोर जात असल्याचे ही नमूद केले. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आपल्याकडे प्लॅन बी ची गरज असल्यचे आवर्जून सांगितले. आपण प्रथमतः आर्थिक साक्षर होऊन आपल्या कुटुंबाचा भार उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले आणि बँकिंग हे सेक्टर त्यांनी प्लॅन बी म्हणून वापरलं. त्यांनी सहा महिन्याच्या यु टूब वरील मोफत मार्गदर्शन व स्व अभ्यासांती हे येश संपादन केल्याची आपली संपूर्ण कहाणी विद्यर्थ्याना सांगितली. यश संपादन करण्यसाठी विद्यार्थ्यांनी शिकत असताना आपला वेळ कॉलेजमध्ये जास्तीत जास्त देऊन उपलब्ध असणारे कॉम्प्युटर, पुस्तके, मासिके, वाचन कक्ष व स्पर्धा परीक्षा कक्ष यांचा भरपूर उपयोग घेऊन आपणाला सशक्त व गुणवंत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे नमूद केले. शिकत असताना या सोई आपणाला मोफत मिळत असतात, पण एकदा, आपण शिक्षण पूर्ण केले की ते आपणाला पैसे देऊनही लवकर मिळत नाहीत याची आवर्जून नोंद केली. बँकिंग क्षेत्र हे खूप मोठे क्षेत्र असून या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असून त्यांचे पगारही मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु हे क्षेत्र महाराष्ट्रातील विद्यार्थी यांच्याकडून दुर्लक्षित होत असल्याचे सांगितले. फक्त सहा महिन्याच्या अभ्यासाने त्यांनी कर्नाटका ग्रामीण बँक, बल्लारी येथे ते रुजू होत असल्याचे सांगितले. |
Copyright © 2020 - All Rights Reserved - |
Visitors: |
Designed, Developed & Maintained by |