Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

Plantation

तोष्णीवाल महाविद्यालयात 'ड' झोन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन संपन्न

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 'ड' झोन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर 'ड' झोन क्रॉस कंट्री स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. तळणीकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.
सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी. तळणीकर हे तर मुख्य उपस्थिती डॉ. मीनानाथ गोमचाळे(सचिव,'ड' झोन स्पर्धा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), डॉ. गुरुदास लोकरे ( अथेलेंटिक कोच),डॉ. साहेबराव देवकते (वरिष्ठ मार्गदर्शक), प्रा. रणजीत काकडे (पंचप्रमुख) तसेच महाविद्यालयीन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एच.टी. शिंदे हे होते.
याप्रसंगी प्रास्ताविकात प्रा. एच.टी. शिंदे यांनी सदर स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू व उपयोगिता विषद केली.
डॉ. मीनानाथ गोमचाळे यांनी महाविद्यालयाने सदर स्पर्धेचे सुव्यवस्थितपणे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ.एस. जी.तळणीकर यांनी भारत देशातील खेळाडू हा उत्कृष्ट दर्जाचा आहे मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तो यशाला गवसणी घालू शकत नाही. यासाठी नियमित सराव व योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते असे मत व्यक्त करून सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
सदर स्पर्धेमध्ये सांघिक प्रथम क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय परभणी, द्वितीय क्रमांक तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगाव तर तृतीय क्रमांक आदर्श महाविद्यालय, हिंगोली यांनी पटकावला. वैयक्तिक मुले साठी प्रथम क्रमांक बोंबले छगन (संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड), द्वितीय क्रमांक बनसोडे व्ही. आर. (पठाडे महाविद्यालय, हिंगोली) तर तृतीय क्रमांक कान्हेकर ओम (तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगाव) यांनी पटकावला वैयक्तिक मुलीसाठी प्रथम क्रमांक कु.बाबर परिमला (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सब सेंटर,परभणी), द्वितीय क्रमांक साखरे ए.एस.(श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय, पूर्णा)यांनी पटकावला.
सदर स्पर्धेतील कार्यक्रमाचे संचलन प्रा.टी. यु.केंद्रे यांनी तर आभार प्रा. एच. टी. शिंदे यांनी व्यक्त केला.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग समिती सदस्य डॉ.एस. एस. अग्रवाल,प्रा. बी.जे. गायकवाड, डॉ.डी.एस. धारवाडकर,प्रा.पी.के.घन,डॉ. वाय. एस.नलवार,डॉ. आर.आर.पैठणकर यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सदर स्पर्धेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयीन खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.