Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

Plantation

तोष्णीवाल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुस्तीमध्ये यश

तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथील खेळाडूंनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व कै. नितीन महाविद्यालय,पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन ड-झोन कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.
सदर स्पर्धेमध्ये तोष्णीवाल महाविद्यालयातील खेळाडू जाधव अविनाश लक्ष्मण यांनी ६५ किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर विष्णू रघुनाथ राठोड यांनी ७९किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला व आदित्य दादाराव राठोड यांनी ६१ किलो वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला.
सदर सर्व विजयी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष श्री.बी. आर. तोष्णीवाल,सचिव श्री.यू.एम. शेळके व कार्याध्यक्ष श्री.रमणजी तोष्णीवाल तसेच प्राचार्य डॉ. एस.जी. तळणीकर, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.सदर विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. हेमंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.