Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

Singing Competition

Singing Competition

"समुहगीत गायन स्पर्धेत तोष्णीवाल महाविद्यालयाच्या संघाला तृतीय क्रमांका चे पारितोषिक"

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आदर्श महाविद्यालय,हिंगोली व विद्यार्थी विकास विभाग, स्वा.रा.ती.म.वि.नांदेड़ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय देशभक्तिपर समुहगीत गायन स्पर्धेत तोष्णीवाल महाविद्यालय,सेनगावच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवुन रोख एक हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेचे यशस्वी स्पर्धेक-वैष्णवी खंडेलवाल,आंचल मुंदडा,कृष्णा राऊत, दिपाली सेवलीकर,ऐश्वर्या भालेराव,गौरी पहिनकर हे होते. तर यांना साथ देण्याकरिता सौ.अमृता भालेराव मैडम,अथर्व देशमुख, श्रीया भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले.
या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.विजय वाघ यांनी काम पाहिले. हा विजेता संघ आता पुढील होणाऱ्या विद्यापीठस्तरीय समुहगीत गायन स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या यशस्वी संघाचे संस्थेचे अध्यक्ष श्री.ब्रिजगोपालजी तोष्णीवाल, महाविद्यालयीन विकास समितिचे अध्यक्ष श्री. रमणजी तोष्णीवाल, प्राचार्य.डॉ.श्रीपाद तळणीकर, जिल्हासमन्वयक डॉ.संजीवकुमार अग्रवाल, सांस्कृतिक विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी या सर्वानी विजेत्या स्पर्धेकांचे अभिनंदन केले.