Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

Tiranga rally

Tiranga Rally

हर घर तिरंगा अंतर्गत मौजे लिंगदरी येथे जनजागृती प्रभातफेरी

दि.१२-०८-२०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयीन अमृत महोत्सव समिती तसेच जिल्हा परिषद प्रशाला लिंगदरी यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा जनजागृती प्रभातफेरी मौजे लिंगदरी येथे काढण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा उपक्रमात उस्फुर्त सहभाग नोंदवावा व प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा या उद्देशाने सदर प्रभात फेरी काढण्यात आली होती.
सदर प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. टी. यु. केंद्रे, डॉ. व्ही.बी.कल्याणकर, महाविद्यालयीन अमृत महोत्सव समितीचे डॉ. एस.एस.अग्रवाल, डॉ. व्ही.जी. वाघ,क्रीडा संचालक प्रा. एच.टी. शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
जनजागृती प्रभात फेरीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, जिल्हा परिषद प्रशाला लिंगदरी येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच लिंगदरी येथील सरपंच सौ. सुनीता राठोड, ग्रामसेवक श्री. समाधान वाघमारे व लिंगदरी ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला.
सदर प्रभात फेरीनंतर महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित मानवी साखळीच्या माध्यमातून प्रतीकात्मक चिन्ह तयार करून सदर जनजागृती प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.