*Reaccreditated by NAAC with 'B++' Grade(CGPA: 2.98)*, *ISO 9001: 2015 certified*
Announcements CMS College Mobile app
सेनगाव येथील तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी कै. अयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातील संत शिरोमणी नामदेव महाराज सभागृह येथे करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमणजी तोष्णीवाल, अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती, उद्घाटक डॉ. डी एम नेटके, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ. विठ्ठल भानुसे, प्रा भरत रेडलॉन, प्रा मुरलीधर जायभाये तर प्राचार्य डॉ. एस.जी तळणीकर, डॉ. एस आर पजई ,समन्वयक यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.जी. तळणीकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ. डी.जी सावंत यांनी करून दिला.महाराष्ट्रातील बावीस संघाने स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यात अकलूज, अकोला, लातूर, बीड ,वाशिम, रिसोड आदी शहरांचा समावेश होता. परीक्षा संचालक डॉ.नेटके यांनी विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनण्याचा सल्ला दिला. पुस्तिका ज्ञान जितके श्रेष्ठ दर्जाचे किंबहुना तितकेच व्यवहारिक ज्ञान गरजेचे आहे. प्रा भरत रीडलॉन यांनी स्पर्धा निकोप असावी, परिश्रम केल्यास यश हमखास मिळते असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला .कार्यक्रमाचे अध्यक्ष रमण तोष्णीवाल यांनी अध्यक्षीय समारोप करताना भविष्यातही या स्पर्धेचे आयोजन भव्य स्वरूपात केले जाईल. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधाचा विद्यार्थ्यांनी उपयोग घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. एस आर पजई यांनी केले. विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. |
|
Copyright © 2020 - All Rights Reserved - |
Visitors: |
Designed, Developed & Maintained by |