Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

Kidney Awareness

तोष्णीवाल महाविद्यालयात  किडनी वाचवा अभियाना अंतर्गत कार्यक्रम

सेनगाव दिनांक 26 जानेवारी 2023 येथील तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात किडनी बचाव अभियानाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीपाद तळणीकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ. राजेश जोशी हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील डायलिसिस विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुकाराम आऊलवार यांनी दिलेल्या माहिती माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये दिलेला किडनी निरोगी राहण्यासाठी चा संदेश सर्वांसमोर डॉक्टर विजय वाघ यांनी वाचून दाखवला. यावेळी जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या बिल्ल्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय किडनी वाचवा आणि किडनी अटॅक थांबवा या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत तोष्णीवाल महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.