Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

Chess

तोष्णीवाल महाविद्यालयातील खेळाडूंचे क्रिकेट स्पर्धेत यश

तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत तोष्णीवाल महाविद्यालयीन संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
१९ वर्ष वयोगटात, तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव विरुद्ध अप्पास्वामी महाविद्यालय, सेनगाव यांच्यात अंतिम सामना झाला. सदर सामन्यात तोष्णीवाल महाविद्यालयातील खेळाडूंनी यशस्वी कामगिरी करत विजय मिळवून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र झाले
या स्पर्धेत झिंगरे शुभम,देशमुख गणेश, कोरडे गणेश,देशमुख कुनाल, तायडे अनिकेत,शेख समीर, जिरवणकर कृष्णा, गायकवाड करण, डाळ गणेश, काळे संतोष, बांगर हनुमान, नवगणकर वेदांत, गिरे लखन, आसनकर सौरभ, मोगले हर्षद, शेख शहीद यांनी यशस्वी कामगिरी केली.
त्यांच्या सदर यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थाअध्यक्ष मा.श्री. बी.आर.तोष्णीवाल, सचिव मा. श्री. यु.एम.शेळके, उपाअध्यक्ष मा.श्री. सुभाषआप्पा एकशिंगे, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष मा.श्री. रमणजी तोष्णीवाल,प्राचार्य डॉ.एस.जी.तळणीकर व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सदर स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. हेमंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.