Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

Chess

तोष्णीवाल महाविद्यालयात तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजनः

सेनगांव: दिनांक 06/12/2022 रोजी सेनगांव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगांव येथे तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. एस.जी.तळणीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक श्री नाईक एस. एस. व तोष्णीवाल महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी. विभाग समन्वयक
प्रा.डाॅ. आर.ए.जोशी हे होते. या स्पर्धा 14, 17, 19 या वयोगडातील मुला मुलींच्या होत्या पंच म्हणून श्री गाडेकर सर, श्री सोनटक्के सर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास श्री ओमप्रकाश भिसे, श्री धिवंडे, श्री. पाटील सर, श्री नाईकसर, प्रा. गायकवाड सर, प्रा. हेमंद शिंदे आदी उपस्थित होते. सुरूवातीला स्पर्धेचे आयोजना मागील भूमीका विशद करण्यात आली. विद्याथ्र्यांना बुध्दीबळ स्पर्धेचे नियम सांगून विद्याथ्र्यांची बौध्दीक क्षमता वृध्दींगत होण्यासाठी हा क्रीडा प्रकार महत्वपूर्ण कसा आहे हे सांगण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.